Bhivaji Pavbhaji Corner

Bhivaji Pavbhaji Corner Pavbhaji and tava pulao

13/05/2022

*_माणूस मांसाहारी आहे की शाकाहारी… पूर्ण वाचा_*

शिक्षकांनी दिले अद्भुत ज्ञान

एकदा एका चिंतनशील शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारले की
तुम्ही लोक कुठेतरी जात आहात आणि
समोरून एखादा कीटक, कोळी किंवा साप, सरडा किंवा गाई-म्हैस किंवा यापेक्षा वेगळा कोणताही विचित्र प्राणी दिसला, जो तुम्ही आयुष्यात यापूर्वी कधीही पाहिला नसेल, तर प्रश्न पडतो.
तुम्ही ते कसे ओळखता
की तो प्राणी अंडी घालतो की बाळाला जन्म देतो?
हे कसे ओळखाल?

बहुतेक मुले गप्प बसली
तर काही मुलांमध्ये कुजबुज धांदल चालूच राहिली….

दोन मिनिटांनंतर शांतता झाली
तेव्हा त्या चिंतनशील शिक्षकाने स्वतः सांगितले
खूप सोपे आहे,,
ज्यांचे *कान बाहेर दिसतात* ते सर्व बाळ देतात*
आणि ज्यांचे कान बाहेर दिसत नाहीत असे प्राणी
*ते अंडी घालतात*.....
मग दुसरा प्रश्न विचारला-
मला सांगा तुम्हा लोकांसमोर एखादा प्राणी आला आहे... मग तुम्हाला कसे कळणार की तो *शाकाहारी आहे की मांसाहारी?*
कारण तुम्ही त्याला याआधी जेवतानाही पाहिले नसेल,
पुन्हा तेच कुतूहल आणि खुसर सफुसरचे आवाज मुलांमध्ये.....

शिक्षक म्हणाले-
बघा खूप सोपे आहे
ज्या जीवांचे डोळे गोलाकार बाह्य रचना आहेत, ते सर्व मांसाहारी आहेत.
उदाहरणार्थ, कुत्रा, मांजर, बाज पक्षी, सिंह, लांडगा, गरुड किंवा आपल्या सभोवतालचा कोणताही प्राणी ज्याचे डोळे गोल आहेत, तो मांसाहारी असेल.
त्याचप्रमाणे डोळ्यांची बाह्य रचना लांबलचक आहे, ते सर्व प्राणी शाकाहारी आहेत.
उदाहरणार्थ, हरिण, गाय, हत्ती, बैल, म्हैस, बकरी इ.
त्यांचे डोळे बाहेरून लांब असतात.

मग चिंतनशील शिक्षकाने मुलांना विचारले-
मुलांनो, आता मला सांगा माणसाचे डोळे गोल आहेत की लांबीचे?

यावेळी सर्व मुलांनी सांगितले की, मानवी डोळे लांब असतात...
ह्या वर
शिक्षकांनी पुन्हा मुलांना विचारले
मला सांगा, यानुसार माणूस शाकाहारी झाला की मांसाहारी?
सर्व मुलांचे उत्तर *शाकाहारी* होते.

मग शिक्षकाला विचारले
मुलांनो आता हे सांगा की
मग मानवातील अनेक लोक मांसाहार का करतात?
तर यावेळी मुलांनी अतिशय गंभीर उत्तर दिले
आणि ते उत्तर होते की
*अज्ञानामुळे किंवा मूर्खपणामुळे*.

मग त्या चिंतनशील शिक्षकाने मुलांना आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे
ज्यांची नखे तीक्ष्ण आहेत, ते सर्व प्राणी मांसाहारी आहेत.
जसे- सिंह, मांजर, कुत्रा, बाज, गिधाड किंवा तीक्ष्ण टोकदार नखे असलेला इतर कोणताही प्राणी....
आणि
ज्या प्राण्यांची नखे रुंद आणि सपाट आहेत, ते सर्व शाकाहारी आहेत.
उदाहरणार्थ, गाय, घोडा, गाढव, बैल, हत्ती, उंट, हरिण, बकरी इ.

यानुसार आता मला सांगा आपली नखे तीक्ष्ण, धारदार की सपाट रुंद असतात?

सर्व मुले म्हणाली
रुंद सपाट,

मग शिक्षकाने विचारले
आता मला सांगा, यानुसार माणूस कोणत्या जीवांच्या श्रेणीत आला?
सर्व मुले एकाच आवाजात म्हणाली
*शाकाहारी*.

मग शिक्षकांनी तिसरी गोष्ट मुलांना सांगितली की,
जे प्राणी किंवा पशु घाम गाळतात, ते सर्व शाकाहारी आहेत,
उदाहरणार्थ, घोडा, बैल, गाय, म्हैस, खेचर इत्यादी अनेक प्राणी.
तर
मांसाहारी प्राण्यांना घाम येत नाही, त्यामुळे नैसर्गिकरित्या ते जीव जीभ बाहेर काढून लाळ टपकत असताना श्वास घेतात.
अशा प्रकारे ते त्यांच्या शरीरातील उष्णता नियंत्रित करतात.

त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की
माणसांना घाम येतो की लोक त्यांच्या जिभेने तापमान समायोजित करतात??

सर्व मुलांनी सांगितले की माणूस घाम गाळतो,

शिक्षक म्हणाले की बरं आता सांगा
या वस्तुस्थितीवरू मनुष्य कोणत्या वर्गातील आहे हे सिद्ध झाले, सर्व मुले एकत्र म्हणाली -
*शाकाहारी.*

सर्व लोक, विशेषत: अहिंसा, सनातन धर्म, संस्कृती आणि परंपरांवर विश्वास ठेवणारे, नैतिक-बौद्धिक ज्ञान देण्यासाठी किंवा मुलांना शिकवण्यासाठी अशी संभाषण शैली विकसित करू शकतात.
यातून ते जे शिकतील ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल.

लक्षात ठेवा, अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही.

*मुले मोठी झाली तर माहिती नसल्यामुळे शाकाहारी माणूस मांसाहार कसा वापरतो हे देखील सांगा आणि सांगतो की जेंव्हा अन्न पिकत नव्हते तेंव्हा माणसे मांस खात असत, हे अगदी चुकीचे आहे तेव्हा मानवी कंद खाऊन- जगायचे. मूळं आणि फळांवर, जे योग्य आहे आणि त्यांची रचना आणि निसर्गाशी देखील जुळते.* .

ज्ञानात भर म्हणून पाठवितोय बाकी ज्याचे त्याचे व्यक्ती स्वातंत्र्य.
माझ्या सह सर्वांचेच....

13/05/2022

मित्रा *.. जरा कांदा घेतोस* .. ?
आमच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या माणसाने आवाज दिला ..
तसा वेटर विनम्रपणे त्याच्याजवळ आला ...
सर ... चॉप करून देऊ की पिसेस मध्ये ... ?
तसा तो बेफिकीर स्वरात म्हणाला ... आण कसाही ....
आणि पुढच्याच क्षणी माझी मान गर्क्कन वळली ..
चेहऱ्यावर कमालीची नापसंती ... कपाळावर ठळक आठी ...
'आधी रसने भुलविले - मग उदर शमविले' (हा माझाच श्लोक आहे .. वेदपुराणात शोधू नये) या कॅटेगिरी मधला मी आहे ...
खाण्याच्या बाबतीत चवीशी तडजोड होऊ शकत नाही ... असं माझं 'भीष्ममत' आहे ..
आणि कांदा हा चव वाढवणाऱ्या समस्त गोष्टींमध्ये अग्रस्थानी आहे ... यात शंका नाही .. कांदा हा जगातला असा एकमेव पदार्थ आहे .. जो कसा चिरलाय, यावरून तो कशाबरोबर खायचा हे ठरतं.
नाही कळलं ... ? एक मिनिट ... समजावून सांगतो ...

एकच कांदा वेगवेगळ्या पद्धतीने चिरला की त्याची चव वेगवेगळी लागते ..
म्हणजे बघा .. पावभाजी सोबतच कांदा ...
हा साधारण पाव सेंटीमीटर च्या आकारात एकसारखा चिरलेला हवा ..
कांदा असा चिरला की त्याला हलकासा रस सुटतो ..
हा रस भाजीच्या तिखटपणाला अचूक छेद देत तिची गंमत वाढवतो ...

मिसळीचा कांदा .. तोही खरं तर बारीक चिरलेला ..
पण त्यात वरच्यासारखी एकसंधता असता कामा नये ..
काही तुकडे लहान हवेत ... काही किंचित मोठे हवेत .. !
मिसळीत असूनही कांद्याने आपली आयडेंटिटी टिकवली पाहिजे ... तर मजा आहे ..
तर्रीत तरंगणारी मिसळ खाताना कांद्याचा एखादा किंचित मोठा तुकडा दाताखाली येतो तेव्हा जी अनुभूती येते ती निव्वळ अवर्णनीय.

बऱ्याचदा जेवणात आपण गोल चकत्या केलेला कांदा घेतो ...
दातांना चाळा आणि जिभेला ब्रेक म्हणून ठीक आहे ...

ताटात वाढली जाणारी कांद्याची अजून एक पद्धत म्हणजे 'कंटाळकांदा'…
जेवणाची ताटं वाढलेली असताना नवऱ्याने ऐनवेळी कांदा मागितला की बायको रागाने कांद्यावर वार करून त्याच्या चार फोडी करते आणि वाढते .. त्याला 'कंटाळकांदा' असं म्हणतात ...
हा प्रकार आपल्याकडे विशेष लोकप्रिय आहे ... कारण तो सोपा आहे ..
पण मला तो केविलवाणा वाटतो ...
एखादा नको असलेला मुलगा आपल्या ग्रुपमध्ये शिरला की कसं फिलिंग येतं .. अगदी तसं फिलिंग हा कांदा देतो ... अशा प्रकारे चार तुकडे करून कांदा देणारी हॉटेल्सही मला फार रुचत नाहीत ...
कारण त्यात प्रेमाने खाऊ घालण्यापेक्षा कर्तव्य उरकल्याची भावनाच जास्त असते ..
ताटातलं खाद्य बदलेल ... तसं कांद्याचं रूप बदलून वाढतो .. तो खरा ..

म्हणजे कधी कधी तुम्ही तंदूर ऑर्डर करता आणि त्या सोबत एक विलक्षण इंटरेस्टिंग कांदा येतो ..
हा कांदा पाकळी पाकळी वेगळी करून सर्व्ह केला जातॊ ...
तंदूरमधल्या बटाट्यापासून .. पनिरपर्यंत आणि चिकनपासून शीख कबाबपर्यंत प्रत्येकाशी याची सलगी असते ... अर्धवट खरपूस भाजलेला .. तंदूरच्या मसाल्यात चिंब झालेला आणि आपल्या सोबत्याला (पनीर / चिकन) घट्ट बिलगलेला पाकळीचा कांदा म्हणजे स्वर्गसुख ... ! तो टाळून इतर कुठलाही कांदा तंदूरसोबत खाणारे खाद्यनगरीचे गुन्हेगार आहेत .. असं माझं स्पष्ट मत आहे ...

अर्थात तंदूरबरोबरचा हा कांदा बटर चिकन बरोबर अजिबात शोभत नाही ...
किंबहुना कुठल्याच पंजाबी डिशसोबत शोभत नाही ...
तिथे व्हिनेगर मध्ये बुडवलेला हलकासा लालसर झालेला आंबटसर अख्खा कांदाच हवा ...
घी मध्ये शब्दशः न्हायलेली बटर चिकनची डिश .. गरम गरम नानच्या तुकड्यासोबत तिचा घास घ्यायचा आणि मग एकच चावा घेऊन अर्धा कांदा फस्त करायचा ...
देवा ... सुखाची परमोच्च कल्पना ... त्या क्षणी देवाने उचललं तरी मोक्ष मिळेल अशी स्थिती ..

हो पण ... याच बटर चिकनची जागा जेव्हा कोल्हापुरी मटण घेतं .. तेव्हा कांद्याचं रूप ही निर्विवादपणे बदलतं ... तिथे झणझणीत पांढऱ्या तांबड्याबरोबर गोड दह्यात सराबोर असलेला उभा चिरलेला कांदाच तोंडी लावायला हवा .. आणि कोल्हापूरचं मालवण झालं की हाच गोल चिरलेला कांदा लिंबाच्या रसात कुस्करून खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर वाढला जायला हवा ...

आणखी एक महत्वाचं ...
जेव्हा चुलीवरची भाकरी ... भरली वांगी आणि झुणका ताटात सजतो .. तेव्हा कांदा चिरण्या-कापण्याच्या आणि सोलण्याच्या फंदात पडूच नये ... जमिनीवर ठेवावा नि हाताने उभा चेचावा ..
हो .. पण यातल्या बाहेरच्या पाकळ्या खायच्या नाहीत हां ...
मधली कोवळी पाकळी खायची फक्त ...
तुम्हाला सांगतो .. शहाळ्यातली मलई झक मारेल ..

एकूण काय ... 'जैसा देस वैसा भेस'च्या धर्तीवर ... जसं जेवण तसा कांदा !
तेव्हा यापुढे हॉटेलात काय किंवा घरी काय 'आण कसाही' म्हणायची चूक करू नका ..
चोखंदळ रहा ... अहो, शास्त्र असतं ते .... !


*खवैय्या* 😋

*जन्म कोकणातला...*मालवणी भोजन म्हणजे फक्त मांसाहार हे समीकरण तसं चुकीचंच आहे, कारण मालवणी शाकाहार देखील तेवढाच समृद्ध आह...
12/08/2021

*जन्म कोकणातला...*

मालवणी भोजन म्हणजे फक्त मांसाहार हे समीकरण तसं चुकीचंच आहे, कारण मालवणी शाकाहार देखील तेवढाच समृद्ध आहे...

आंबोळ्या, घावणे मालवणी जेवणातील अविभाज्य घटक आहेत. काळ्या वाटाण्याची आमटी आणि तांदळाचे वडे, रव्याची लापशी किंवा तांदळाची खीर जसे लग्नकार्यात करावेच लागतात, तसेच श्राद्धकर्माच्या वेळीही तितकेच आवश्यक असतात.

खापरोळी, भोपळ्याचे वडे, मालपोआ हे पदार्थ प्रसंगानुसार केले जातात. नागपंचमीच्या सणाला हळदीच्या पानात बनवलेले पातोळे, नारळाच्या रसात गूळ-वेलची घालून त्याबरोबर खाल्लेल्या तांदळाच्या किंवा नाचणीच्या शेवया, काकडीचं धोंडस, उकडीचे मोदक, अळूवड्या, मूगडाळीचं कढण, कारल्याची चटणी, ओल्या नारळाच्या पुरणाच्या करंज्या यांची सणासुदीला वर्णी लागतेच.

खोबऱ्याच्या वड्या, शेंगदाण्याचे खडखडे लाडू, शेवेचे लाडू, खाजं ही भेट कोकणातून आलेल्यांकडून येतेच. मुगाचे, चण्याचे किंवा उकड्या तांदळाचे लाडू ही मालवणी लोकांची खासियतच असते.

मोसमाप्रमाणे रातांब्याचं (कोकम फळाचं) सरबत, रायवळ आंब्याचं रायतं, कैरीचं लोणचं, विलायती फणसाची कापं किंवा भाजी, लाल भोपळ्याचे वडे, अळूच्या गाठीची भाजी, भरलेल्या मिरच्या, मायाळूच्या पानांची भजी, सुरणाच्या काचऱ्या केल्या जातात...

गोळ्यांची, टोमॅटोची आमटी माशाच्या आमटीच्या मसाल्यात केली जाते...
प्रत्येक मालवणी घरात बिडाच्या तव्याबरोबर आप्पेपात्रही असतेच... भरपूर काजू व शेंगदाणे घालून गोडाचे तसेच तिखटाचेही आप्पे सणासुदीला केले जातात.

मोड आलेल्या मुगाची, कुळथाची, वालाची, चवळीची आमटीदेखील मटणाच्या मसाल्यात केली जाते.
ओल्या काजूची उसळ जो खाईल त्याच्या हाताचा वास जाणार नाही, हे निश्चितच.!

फणसाच्या घोट्या (आठुळ) घालून केलेली टाकळ्याची भाजी, उडदाचं डांगर, वांग्याचं भरीत, कच्च्या फणसाची भाजी किंवा गऱ्या-गोट्यांची भाजी इतकंच काय शेवग्याच्या शेंगाचं चण्याच्या डाळीचं पिठलंही सुरेखच!! नुसती कांदा-मिरची घातलेली वालीची भाजी असो की मसालेदार भरली वांगी, जिरं, खोबरं वाटून लावलेलं तुरीच्या डाळीचं वरण असो... मुळ्याची पीठ भरलेली भाजी असो की परतलेल्या अळंब्या सारं काही जिभेचे चोचले पुरविणारं!!

मुगाच्या डाळीची साधी किंवा तिखट खिचडी देखील भूक शमवते, मनाला तृप्ती देते. खिचडी बरोबर ताकाची कढी असेल आणि एखादा तळलेला उडदाचा पापड तर मजा काही औरच.!

अशा प्रकारे वैविध्यपूर्ण मालवणी जेवणावर कोणीही फिदा होईलच..

मालवणी माणसापुढे तुम्ही पंजाबी, मोगलाई, चायनीज, इटालियन, मेक्सिकन, थाई, देशी-विदेशी खाद्यपदार्थाची जत्रा मांडा, तो आनंदाने ते भोजन चाखेल, पण घरी आल्यावर स्वयंपाक घरात जाऊन आईने किंवा बायकोने आज काय जेवण केलं होतं, त्यातलं काही उरलय का? याची निश्चितच चौकशी करेल.

प्रिय ग्राहक राजा,हितचिंतकतुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भिवाजी पावभाजी ला ७ वर्ष पूर्ण झाली उद्या कोजागिरी पौर्णिमेला ...
29/10/2020

प्रिय ग्राहक राजा,हितचिंतक
तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भिवाजी पावभाजी ला ७ वर्ष पूर्ण झाली उद्या कोजागिरी पौर्णिमेला ८व्या वर्षात पदार्पण करणार आहे.
सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

19/02/2020

मित्रा .. जरा कांदा घेतोस .. ?
आमच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या माणसाने आवाज दिला ..
तसा वेटर विनम्रपणे त्याच्याजवळ आला ...
सर ... चॉप करून देऊ की पिसेस मध्ये ... ?
तसा तो बेफिकीर स्वरात म्हणाला ... आण कसा ही ....
आणि पुढच्याच क्षणी माझी मान गर्र्कन वळली ..
चेहऱ्यावर कमालीची नापसंती ... कपाळावर ठळक आठी ...
'आधी रसने भुलविले - मग उदर शमविले' (हा माझाच श्लोक आहे .. वेदपुराणात शोधू नये) या कॅटेगिरी मधला मी आहे ...
खाण्याच्या बाबतीत चवीशी तडजोड होऊ शकत नाही ... असं माझं 'भीष्ममत' आहे ..
आणि कांदा हा चव वाढवणाऱ्या समस्त गोष्टींमध्ये अग्रस्थानी आहे ... यात शंका नाही .. कांदा हा जगातला असा एकमेव पदार्थ आहे .. जो कसा चिरलाय, यावरून तो कशाबरोबर खायचा हे ठरतं.
नाही कळलं ... ? एक मिनिट ... समजावून सांगतो ...
एकच कांदा वेगवेगळ्या पद्धतीने चिरला की त्याची चव वेगवेगळी लागते ..
म्हणजे बघा .. पावभाजी सोबतच कांदा ...
हा साधारण पाव सेंटीमीटर च्या आकारात एकसारखा चिरलेला हवा ..
कांदा असा चिरला की त्याला हलकासा रस सुटतो ..
हा रस भाजीच्या तिखटपणाला अचूक छेद देत तिची गंमत वाढवतो ...
मिसळीचा कांदा .. तो ही खरं तर बारीक चिरलेला ..
पण त्यात वरच्यासारखी एकसंधता असता कामा नये ..
काही तुकडे लहान हवेत ... काही किंचित मोठे हवेत .. !
मिसळीत असूनही कांद्याने आपली आयडेंटिटी टिकवली पाहिजे ... तर मजा आहे ..
तर्रीत तरंगणारी मिसळ खाताना कांद्याचा एखादा किंचित मोठा तुकडा दाताखाली येतो तेव्हा जी अनुभूती येते ती निव्वळ अवर्णनीय.
बऱ्याचदा जेवणात आपण गोल चकत्या केलेला कांदा घेतो ...
दातांना चाळा आणि जिभेला ब्रेक म्हणून ठीक आहे ...
पण माझ्या दृष्टीने त्याची फार मोठी ओळख नाही ..
म्हणजे भारताच्या राजकारणात अण्णा हजारेंच्या उपोषणाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या कांद्याला जेवणात असतं .,.
त्यापेक्षा मद्यपान करत असताना सॅलड मध्ये असलेला हाच गोल चकतीचा कांदा जास्त रंगत आणतो ..
मद्याची कडवट चव जिभेवर असताना हा कांदा जिभेवर चुरचुरला की पिण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं ...
ताटात वाढली जाणारी कांद्याची अजून एक पद्धत म्हणजे 'कंटाळकांदा'
जेवणाची ताटं वाढलेली असताना नवऱ्याने ऐनवेळी कांदा मागितला की बायको रागाने कांद्यावर वार करून त्याच्या चार फोडी करते आणि वाढते .. त्याला 'कंटाळकांदा' असं म्हणतात ...
हा प्रकार आपल्याकडे विशेष लोकप्रिय आहे ... कारण तो सोपा आहे ..
पण मला तो केविलवाणा वाटतो ...
एखादा नको असलेला मुलगा आपल्या ग्रुपमध्ये शिरला की कसं फिलिंग येतं .. अगदी तसं फिलिंग हा कांदा देतो ... अशा प्रकारे चार तुकडे करून कांदा देणारी हॉटेल्सही मला फार रुचत नाहीत ...
कारण त्यात प्रेमाने खाऊ घालण्यापेक्षा कर्तव्य उरकल्याची भावनाच जास्त असते ..
ताटातलं खाद्य बदलेल ... तसं कांद्याचं रूप बदलून वाढतो .. तो खरा ..
म्हणजे कधी कधी तुम्ही तंदूर ऑर्डर करता आणि त्या सोबत एक विलक्षण इंटरेस्टिंग कांदा येतो ..
हा कांदा पाकळी पाकळी वेगळी करून सर्व्ह केला जातॊ ...
तंदूरमधल्या बटाट्यापासून .. पनिरपर्यंत आणि चिकनपासून शीख कबाबपर्यंत प्रत्येकाशी याची सलगी असते ... अर्धवट खरपूस भाजलेला .. तंदूरच्या मसाल्यात चिंब झालेला आणि आपल्या सोबत्याला (पनीर / चिकन) घट्ट बिलगलेला पाकळीचा कांदा म्हणजे स्वर्गसुख ... ! तो टाळून इतर कुठलाही कांदा तंदूरसोबत खाणारे खाद्यनगरीचे गुन्हेगार आहेत .. असं माझं स्पष्ट मत आहे ...
अर्थात तंदूरबरोबरचा हा कांदा बटर चिकन बरोबर अजिबात शोभत नाही ...
किंबहुना कुठल्याच पंजाबी डिशसोबत शोभत नाही ...
तिथे व्हिनेगर मध्ये बुडवलेला हलकासा लालसर झालेला आंबटसर अख्खा कांदाच हवा ...
घी मध्ये शब्दशः न्हायलेली बटर चिकनची डिश .. गरम गरम नानच्या तुकड्यासोबत तिचा घास घ्यायचा आणि मग एकच चावा घेऊन अर्धा कांदा फस्त करायचा ...
देवा ... सुखाची परमोच्च कल्पना ... त्या क्षणी देवाने उचललं तरी मोक्ष मिळेल अशी स्थिती ..
हो पण ... याच बटर चिकनची जागा जेव्हा कोल्हापुरी मटण घेतं .. तेव्हा कांद्याचं रूप ही निर्विवादपणे बदलतं ... तिथे झणझणीत पांढऱ्या तांबड्याबरोबर गोड दह्यात सराबोर असलेला उभा चिरलेला कांदाच तोंडी लावायला हवा .. आणि कोल्हापूरचं मालवण झालं की हाच गोल चिरलेला कांदा लिंबाच्या रसात कुस्करून खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर वाढला जायला हवा ...
आणखी एक महत्वाचं ...
जेव्हा चुलीवरची भाकरी ... भरली वांगी आणि झुणका ताटात सजतो .. तेव्हा कांदा चिरण्या - कापण्याच्या आणि सोलण्याच्या फंदात पडूच नये ... जमिनीवर ठेवावा नि हाताने उभा चेचावा ..
हो .. पण यातल्या बाहेरच्या पाकळ्या खायच्या नाहीत हां ...
मधली कोवळी पाकळी खायची फक्त ...
तुम्हाला सांगतो .. शहाळ्यातली मलई झक मारेल ..
एकूण काय ... 'जैसा देस वैसा भेस'च्या धर्तीवर ... जसं जेवण तसा कांदा !
तेव्हा यापुढे हॉटेलात काय किंवा घरी काय 'आण कसा ही' म्हणायची चूक करू नका ..
चोखंदळ रहा ... अहो ... शास्त्र असतं ते .... !

19/08/2019

वरण भात "

तुम्हाला १०-१२ दिवस कुठे बाहेरगावी गेल्यावर जर कधी एकदा "वरणभात" खातोय असे होत असेल तर समजा की तुम्ही पक्के महाराष्ट्रीयन आहात!पॉप्युलर महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थात पुरणपोळीचा नंबर जरी वर असला तरी पुरणपोळीचा बेत केल्यावर आपण म्हणतो "आज पुरणा वरणाचा स्वयंपाक आहे".

सुवासिक आंबेमोहोर तांदळाचा वाफाळता मऊ भात.. त्यावर तुरीच्या डाळीचे घट्ट गोडसर साधे वरण ! भात मऊ असावा. वरण एकजीव घोटलेले असावे. पाणी आणि डाळ वेगळी नसावी. तूप रवाळ आणि साजूक असावे! यात चवीपुरते मीठ आणि लिंबू पिळून कालवले की एक अजरामर डिश तयार होते. वरण भात! ते कालवण्याचीपण एक कला आहे. वरण लिंबू मीठ तूप सगळीकडे समान पसरायला हवे. भात फार घट्ट किंवा फार सैलसर नको. तर असा अद्वितीय वरणभात खाल्ला की ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा.
आपण हल्ली चौरस आहार, वन डिश मिल वगैरेंच्या गोष्टी करतो. तुम्हाला सांगते, वरणभातासारखे दुसरी चौरस आहाराचे वन डिश मिल नाही! भातातून कार्ब्ज, वरणातून प्रोटीन, लिंबातून व्हिटॅमिन आणि तुपातून फॅट्स मिळतात! वन डिश मील शोधणाऱ्या माणसाला अजून काय हवे? हे म्हणजे काखेत कळसा अन गावाला वळसा अशातला प्रकार झाला!

आपल्याकडे देवाच्या नैवेद्याला ताटात बाकी कुठला पदार्थ कमी जास्त असला तरी वरण भात लागतोच! भाताची सुबक मूद आणि त्यावर वरण तूप आणि तुळशीपत्र ठेवले की त्या नैवेद्याने देवही प्रसन्न होतो!
जेवणाची पंगत देखील वरण भाताने सुरू होते. डावी उजवी बाजू वाढून झाल्यावर भात येतो. मागोमाग वरण आणि एकदा त्यावर तूप पडले की "वदनी कवळ घेता" या श्लोकाने पंगत सुरू होते.

लहान मूल दूध प्यायच्या स्टेजमधून सॉलिड खाण्याच्या स्टेजमध्ये आले की त्याला आपण त्यांना वरण भात द्यायला सुरुवात करतो. कोणी आजारी असेल किंवा
आजारातून उठले असेल तर त्यांनाही आपण वरण भात देतो. म्हणारपणी अन्न नीट चावून खाता येत नसेल तर उत्तम पर्याय म्हणजे वरणभात असतो!

माझी मुलगी मला सांगते," मम्मा तू आजीकडून वरण शिकून घे. आजीचा वरण भात यंमी असतो." आणि मलाही "सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी" सारखे वाटते. खरेच आईसारखे वरण काही जमत नाही आपल्याला 😃😃 त्याची चवच वेगळी 😋😋 त्यातली आपुलकी माया प्रेम ममता तर अफलातूनच

आपल्यापैकी बहुतेक लोकांचे वरणभात हे कम्फर्ट फूड असते! म्हणजे जे खाल्ल्यावर पोटच नाही तर आत्मा तृप्त होतो!

माझा तर नक्कीच होते. तुमचा होतो का?

22/06/2019

खरडा आणि ठेचा....

मिरची वंश परंपरेमधले हे उच्चकोटीचे राजश्री पदार्थ...

खरडा आणि ठेचा यांच कुळ जरी एक असल तरी हे दोन्ही भिन्न पदार्थ...त्यात गल्लत बिलकूल होता कामा नये...

खरडा बनवतात तो दोन्ही, हिरव्या आणि लाल मिरचीचा तर अस्सल ठेचा बनतो फक्त टंच रसरसलेल्या हिरव्यागार मिरचीचाच...

आजकाल बाजारात पेस्ट सारखा लाल मिरचीचा पदार्थ येतो त्यालाच ठेचा म्हणून खपवल जात पण त्यात काही मजा नाही....

ओबड-धोबड शेंगदाणे, मिरच्या, लसूण, तेल घालून केलेला अस्सल खरडा बनतो तो गावाकडेच...मस्त शेणा-मातीच्या सारवलेल्या अंगणातल्या दगडी पाट्या-वरवंट्यावर, आपल्या आई आज्जीने वाटून-घाटून केलेला खरडा म्हणजे फक्त स्वर्ग....

आपली ही माय माउली त्या दगडी पाट्या-वरवंट्यावर हाताने वाटत तन्मयतेने एकजीव करत तो खरडा खरवडत असताना फक्त तीचा चेहरा पहा.....

आपली सर्व माया, ममता,प्रेमभाव त्या खरड्यात ती अर्पण करत असते...आणि त्याच बरोबर तो खरडा पाट्यावर खरवडताना तो जो काही तिच्या बांगडयांचा नाद होतो ना, तो स्वर-नाद त्या खरड्यात मिसळून त्या खरड्याची रंगत आणि चव आणखीच वाढवत असते...

या पाटा वरवंट्यावरच्या खरड्याची चव आपल्या घरातल्या मिक्सरमधल्या भांड्यातल्या खरड्याला अजिबात येतच नाही...

म्हाळसेने त्यासाठी ख़ास दगडी पाट्याचा मिक्सर विकत आणला पण गावच्या मातीची चव त्या मिक्सरच्या खराड्याला नाहीच...

त्यातल्या त्यात लाल मिरचीचा खरडा हा आता थोड़ा विलूप्त होत असलेला पदार्थ...हा असा दगडी पाट्यावर ओबड-धोबड शेंगदाणे घालून केलेला लाल मिरचीचा खरडा समोर आला की जीव नूसता कासावीस होतो...कपाळावरची नस ताड़ताड़ उडायला लागते..

मस्त गरमागरम भाकरीचा वरचा पदर काढायचा आणि आतल्या मऊ भागावर हा लाल मिरचीचा खरडा छान पेरायचा...त्यावर झकास गरम तेलाची धार मारायची...अहाहा... परमेश्वरा... लिहितानाही तोंडात पाणी पाणी होतय.... नूसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले...

काही शे रुपये मोजून ते पावाच्या तुकड्यावर चिली-प्लेक्स टाकून दिलेला पिझ्झा या अश्या खरडा-भाकरी समोर झक मारतोय...

पूर्वी कुठे गावाला जाताना हमखास हा पदार्थ भाकरी बरोबर बांधून दिलेला असायचा...

एखाद्या शेतावर, विहिरीच्या कडेला, हिरव्यागार झाडाच्या सावलीखाली बसून हे अस भाकरी, लाल मिरचीचा खरडा, सोबत कांदा व दही असेल आणि बाजूला आपली म्हाळसा असेलना तर त्यासारखे स्वर्गीय पंचतारांकीत सुख दूसरे कुठले नाही...

हिरव्या मिरचीचा खरडा तसा सर्रास नेहमी
घरात बनतोच...पोळी बरोबर आणि त्यातल्या त्यात दशमी बरोबर खाण्यात याची खरी मजा....आजकाल प्रवासात शक्यतो हा असतोच....

परदेशात प्रवासाला जाताना अगदी हट्टाने हा हिरव्या मिरचीचा खरडा आणि दहा-बारा दशम्या बांधून घ्याव्यात.....दोन तीन दिवस आरामात कटतात...पैसेही वाचतात...

हिरव्या मिरचीचा हा खरडा बनवावा तर घरच्या लोखंडी तव्यावरच...तो बनवताना उडालेला तिखटाचा धुराळा आणि त्याला मिळालेली ठसक्याची आणि शिंकेची मानवंदना...म्हणजे तळपत्या जिभेला एका पर्वणीचे निमंत्रणच...

म्हाळसाने कधी डब्यातल्या पोळीत बांधून दिलेला हा हिरव्या मिरचीचा खरडा पाहिला की वाटत जणू तिने तिचे चटपटीत हृदयच डब्यात दुड़पून दिलय...

ठेचा मात्र फक्त हिरव्या मिरचीचा...लसणाच्या फोडणीचा तड़का दिलेला ठेचा आणि त्याला किंचित लिंबाची दिलेली चव आणि ताटात वाढून घेतला की त्यावर चमचाभर कच्च्या तेलाची धार...

ते सगळ आपल्या अनामिकेने एकजीव करायच आणि तेच बोट तोंडात घातल आणि त्या ठेच्याचा सणसणीत स्पर्श जिभेला झाला की ब्रह्मानंद टाळी लागलीच म्हणून समजा...मेंदूच्या पार शेवटच्या टोकाला पार हादरून सोडतो....आणि कपाळावरचे धर्मबिंदु आणि डोळ्यातले अश्रु त्या ठेच्याला त्रिवार सलामी ठोकतात.....भल्या भल्यांना उभ्याचा आडवा करणारा हा ठेचा म्हणजे मिरची खानदानची शान..

ठेचा शक्यतो कमी तिखटाच्या मिरचीचा करतात...पण अस्सल खवय्या असेल तर त्याने नंदुरबारच्या किंवा गुंटूरच्या जहाल लवंगी मिरचीचा आग्रह धरावा...हे वाण वेगळच...

खरतर ठेचा काय की खरडा काय या दोघात उजवं कोण आणि डावं कोण हे सांगण जरा कठीणच...

ठेचा आणि खरडा म्हणजे जणू काही माधुरी आणि ऐश्वर्या...

खरड्यात दिसतात माधुरीच्या अदा तर ठेच्यात अवतरते ऐश्वर्याची नजाकत...

खरड्यात जाणवतो माधुरीचा ठसका बाणा तर ठेचा मिरवतो ऐश्वर्यासारखा तोरा...

आणि चुकून हे खरडा आणि ठेचा दोन्ही समोरासमोर आलेच तर लाल शालूतली पारो व हिरव्या पैठणीतली चंद्रमुखी देवा देवा करत आपल्या मागे लागतात..... आपण या लाल-हिरव्या मिरचीचे 'देवदास' होतो आणि आपल मन " डोला रे डोला रे डोला रे डोला..." अस म्हणत आस्वाद घेत झिंगत रहाते...

आताच्या पिढित सांगायच झाल तर हे ठेचा आणि खरडा म्हणजे दिपिका आणि प्रियांका...

एकीला झाकाव दुसरीला काढाव...

यात कोण नखरेल, कोण खानदानी याचा फारसा विचार न करता मस्तानीचा हिरवट नखरा झेलत, लाजून लालेलाल झालेल्या काशीच्या प्रेमात पडत आपण त्यांचा 'पिंगा पिंगा...' बघत बाजीरावासारख खरडा-ठेच्यावर ताव मारत रहाव..

केल्यावर आठवण ठेवा एवढेच.
🤑🌶🌶🌶🌶🌶🌶🌶😅

20/12/2018

शुभ संध्याकाळ फ्रेंड्स.

माणसासारखंच पदार्थांना पण सहजिवन असावे असे मला नेहमी वाटते..एकमेकांना खमंग खुसखुशीत साथ देत ते एकमेकांमधली रूची वाढवत असावेत..

जसं गोबरया गालाच्या टम्म फुगलेल्या पुरी ला साथ द्यावी ती श्रीखंड किंवा गुलाबजामानेच..दुसर्या कोणात तिचे लाड पुरवायची ताकद नाही.. सौंदर्यवती जिलबी ला साजेसा राजस जोडीदार म्हणजे मसाले भातच.. बाकी मठ्ठा म्हणजे तिचा सेवक.. तिचं सगळं सगळं एकणारा...पुरणपोळीच्या सुखदुःखात तिला साथ देते प्रत्यक्ष तिची सवत कटाची आमटीच.. काही लोक तिला आमरसाचं स्थळ आणू पाहतात पण ते काही खरं नाही ..

ढोकळा या पदार्थांच्या अंगात इतक्या नाना कळा आहेत ना..त्या सहन कराव्या त्याच्या girlfriend चिंच खजुराच्या चटणीनेच.. दोघं एकत्र आले की धमाल करतात..मिसळ बहुधा मेषेची किंवा सिंह राशीची असावी ..तिच्या जहालपणाशी समतोल ठेवतो तिचा लाडका पाव.. मुळातच शांत स्वभावाचा..काही कमी पडू देत नाही तो तिला..उपम्याचा मात्र वरचष्मा शेवेवर..तिला काही भाव खाऊ देत नाही तो..इडली ,डोसा,सांबार,चटणी सगळे एकत्र सुखाने नांदतात..अगदी न भांडता..लोण्याने तर जणू जन्म भराच्या आणाभाका घेतल्या असाव्यात थालीपीठासोबत..

चिवडा आणि चकली मात्र खेळगडीच..आपल्याच मस्तीत खेळणारे.. जणू चिवडा खेळ हरायला लागला की चकलीला चिडवत असावा चक चक चकली..मोठ्या घरचा लाडू कधीकधीच खेळायला येतो त्यांच्यासोबत.. आणि लाडू बेसनांकडचा असेल तर त्याची आई त्याला बेदाण्याची तीट लावून मगच बाहेर पाठवत असावी.. शंकरपाळी अन् करंजी सारख्या भांडतात..एका वेळी खेळायला येत नाहीत..

ह्या सगळ्यांमध्ये सोज्वळ ब्रम्हचारी एकच.. ऊकडीचा मोदक..त्याचा दिमाखच वेगळा.. नाही म्हणायला तुपाकडून सेवा करुन घेतो..पण जोडीदार मात्र कोणी नाही त्याचा..
तो असाच एकटा..
अनभिषिक्त राजासारखा😊.

आज भिवाजी पावभाजी काउंटर चे नूतनीकरण करण्यात आले
28/07/2018

आज भिवाजी पावभाजी काउंटर चे नूतनीकरण करण्यात आले

आज दिनांक 28/07/2028 रोजी भिवाजी पाव भाजी काउंटर चे नूतनीकरण करण्यात आले
28/07/2018

आज दिनांक 28/07/2028 रोजी भिवाजी पाव भाजी काउंटर चे नूतनीकरण करण्यात आले

07/01/2018

*पावभाजी*

पोरांना जर करायचय जेवायला राजी
त्यांच्या ताटात हवी रोज बटाटा भाजी

बटाट्याची संपते रोज हंडीवर हंडी
इतर भाजांना वाजते फ्रीजमधेच थंडी

साऱ्या भाजांनी मग केली फ्रीजमधेच चर्चा
अक्षध्यस्थानी होत्या चार ढब्बू मिरच्या

म्हणे परदेशी पदार्थात आम्हाला मोठा मान
इथे मात्र आमच्याकडे कोणाचेच नाही ध्यान

फ्लॉवर म्हणे माझा मसालेदार फक्कड रस्सा
मुलांना मात्र तो का वाटतो नकोसा

वाटाणा म्हणे माझ्या हिरव्यागार शेंगा
पण माझ्या उसळीला मुले दाखवती ठेंगा

टमाटा म्हणे माझे काप जेवणात आणती लज्जत
मुले मात्र खाण्यावरून आईशी घालती हुज्जत

डोळ्यामधे पाणी आणून सांगू लागला कांदा
उग्र वासामुळे माझा झालाय पार वांदा

एका कोपऱ्यात खट्टू होऊन बसली कोथिंबीर जूडी
म्हणे मला मुले चिडवतात ही तर गवताची काडी

फ्रीजमधून बाहेर पडून साऱ्या भाजांनी केला कल्ला
बटाटे समोर येताच चढविला त्यांच्यावर हल्ला

घनघोर या युद्धात भाजांचा सेनापती होता कांदा
बटाट्यासह साऱ्यांचाच युद्धात झाला चेंदामेंदा

भाजांचा तो लगदा बघून आई थोडीशी खचली
मात्र क्षणार्धातच तिला एक नामी युक्ती सुचली

बटर मसाले टाकून त्या लगद्यास दिली आच थोडी
तयार नविन या भाजीस गरम पावाची जोडी

पावभाजीचा असा बेत झाला मस्त
बघता बघता मुलांनी*डोंबिवली तिल फडके रोड ची दामले यांची भिवाजी पावभाजी ची* भाजी फस्त

Address

Damle Building, Phadke Road, Baji Prabhu Chowk Dombivli (E)
Dombivli
421201

Opening Hours

Monday 4pm - 11:30pm
Tuesday 4pm - 11:30pm
Wednesday 4pm - 11:30pm
Thursday 4pm - 11:30pm
Friday 4pm - 11:30pm
Saturday 4pm - 11:30pm
Sunday 4pm - 11:30pm

Telephone

8080203386

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhivaji Pavbhaji Corner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category