30/12/2020
आता कोणाचा पिरेड आहे रे , अनावकर सरांचा ,आईच्या गावात , पोटात गोळाच आला,सर इंग्रजी शिकवत आणि इंग्रज अचानक आमच्या डोक्यावर ५ वी ला पडले होते त्यामुळे स्पेलिंग,ग्रामर मोठी गोची होती , नुकतीच चाचणी परीक्षा झाली होती सरांच्या हातात पेपरचा बंडल होता, काय कुणास ठाऊक पोटात गुड गुड होऊलागले होते, आपली विकेट आहे पण किती रणावर ह्याचे अंदाज बांधता येईना , सर्वांचे पेपर दिले पण मला पेपर मिळाला नाही , मला वाटलं हरवला असेल पण रवी सरांच्या कॅटलॉक बुक मधून त्यांनी माझा पेपर काढला आज ही आठवतात ते वाक्य
राहुल मौजे तुच ना
मी उभा राहिलो,माझ्या जवळ आले
तूला मी शिकवलेलं कळत नाहीका ,
माझी पूर्ण पने हवा टाईट झाली होती , अंग थर थर कापत होत , ताप यायचा बाकी होता,
तुझ्या वडलांना,काकांना,आत्याला मीच शिकवले त्यांनाच काय मी शिकवत असलेल्या एक ही विध्यार्थी इतक्या कमी मारकाने नापास झाला न्हवता तुला तर मार्कच मिळाले नाहीये,पेपर माझ्या तोंडावर मारला ,माझा हात पकडून बाहेर सर्वाना समोर उभा केले ह्याला 0 मार्क मिळालेत शून्य मी जो रडायला सुरवात केली काय सांगू आपली इजत पूर्ण वर्गा समोर काढली गेली होती मूल ,मुली माझ्या कडे बघत होते,मला रवी सरांनी कधीच मारले नाही पण त्यांचे बोल मनाला टोचत होते,शेवटच्या बॅंच वर मी बसणार ढ विद्यार्थी अशी माझी गिणती होऊ लागली होती , रवी सरांनी मला पहिल्या बेंच वर बसवले एका हुशार विध्यार्थी च्या बाजूला त्याचा पहिला नंबर येत म्हणून, रवी सरांनी शाळा सुटल्यावर त्यांच्या ऑफिस बाहेर मला बसवून माझ्या कडून स्पेलिंग,ग्रामर इतकं पाठ करून घेतलं की आजही मी विसरू शकत नाही,वार्षिक परीक्षेत मला इंग्रजीत ५०च्या सरासरीत मार्क होते,पुढच्या वर्षी मात्र रवी सर आम्हाला शिकवण्यास न्हवते , आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या , मला रवी सरांची सही खूप आवडतं मी त्या वेळेस ठरवले होते मी एक दिवस खूप मोठा होईन तेव्हा रवी सरांसारखीच सही करणार आणि मी आज ही तशीच सही करतो , एक क्षण माझ्या डोळ्यात पाणी आणणारा होता , 90 फिट रोडला एक मोठी इंग्रजी मिडिम शाळा आणि कॉलेज आहे, ईडन त्या ठिकाणी मला चिफगेस्ट म्हणून बोलवले होते आणि माझ्या बाजूच्या खुर्चीत रवी सर बसलेले होते मला थोडासा उशीर झाला होता येण्यास , मी येताच अनऊसमेंट झाली होती आणि सर्वे उभे राहिले होते ,माझ्या डोळ्यात पाणी आले होते मी मंचावर गेलो थेट रवी सरांच्या पायाला हात लावला त्यांची ती स्माईल आणि पाठीवर थाप मारत बोले मौजे खूप मोठा हो ,काहीच सुचले नाही मला मी हसलो त्यांनी मिठी मारली , त्या वेळेस ही मी ० मार्कची घटना माझ्या भाषणात बोलो , त्या नंतर मी येईन भेटायला सर , एकत्र जेऊ पण तो योग कधीच आला नाही , रवी सर जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी पेरलेली शिक्षनाची बीज कधी ही न संपणारी आहे,
ईशवर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना ।
राहुल मौजे
दिग्दर्शक
शिशु विकास मंदिर