Saudaminis Spicy Tadka

Saudaminis Spicy Tadka Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saudaminis Spicy Tadka, Restaurant, 23/181, Motilal Nagar No 1, Ground Floor, Backside, Goregaon West, Mumbai.

02/04/2026

*गोरेगावकरांकरता आवाहन...*🙏🏻

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गोरेगाव पश्चिम शाखा असंख्य दुर्मिळ मराठी पुस्तकं वाचकांची वाट पाहत धूळ खात पडून आहेत. सध्या त्या ग्रंथालयाचे सभासद फारच कमी आहेत. भविष्यात हे एवढं निमित्त करून कदाचित ते बंदही पाडलं जाईल.

पण मग नंतर एकेदिवशी ते बंद पडल्यावर व्हॉट्सऍपवर हळहळ आणि दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ असेल काय?

त्यामुळे हीच ती कृती करण्याची वेळ आहे.

या सुंदर ग्रंथालयाला भेट द्या.

तिथली पुस्तकं चाळा, निवडा, वाचा .

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताबडतोब त्याचे सभासद व्हा.

फक्त ७० रुपये महिना एवढीच नाममात्र फी आहे.
स्टेशन पासून अगदी जवळ आहे.
होणाऱ्या सभासदांसाठी QR कोड ची सोय उपलब्ध आहे.

ही काही व्यावसायिक जाहिरात नाही.

ही एका मराठी माणसाची कळकळीची विनंती आहे.

या मराठी ग्रंथालयाचं अस्तित्व हेच त्या परिसरातील मराठी समाजाचं अस्तित्व आहे आणि हे मराठी ग्रंथालय बंद पडणं म्हणजे महाराष्ट्रधर्म कमकुवत होणं आहे.

त्यामुळे आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रधर्मासाठी आणि मराठी समाजाची एकूणच विचार करण्याची क्षमता वाढावी यासाठी एवढं तरी आपण नक्कीच करू शकतो.

आय. बी पटेल म्युनिसिपल शाळा, रूम नं१७, तळ मजला, बंडू गोरे मार्ग स्टेशन रोड गोरेगाव (पश्चिम ), मुंबई-४०० १०४ . मोबाईल नंबर :-७९०००४९०९६

ग्रंथालय मंगळवार ते शनिवार सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत सुरू असते.
सोमवारी साप्ताहिक सुट्टी.

वाचा, विचार करा, सभासद व्हा आणि इतरांनाही सभासद होण्यास सांगा.

ज्या ज्या मराठी माणसाला मराठी भाषा वाचवावी, मराठी साहित्य संस्कृती वाचवावी असे मनापासून वाटते त्यांनी सभासद व्हावे.

ते जमत नसेल तर कमीत कमी एक काम जरूर करावे ते म्हणजे आपापल्या संपर्कातील सर्वांना वरील मेसेज फॉरवर्ड करावा जेणेकरून त्या परिसरातील मराठी माणसापर्यंत ही माहिती पोचेल. धन्यवाद🙏🙏🙏🙏

Address

23/181, Motilal Nagar No 1, Ground Floor, Backside, Goregaon West
Mumbai
400104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saudaminis Spicy Tadka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category