Zaika Chai

Zaika Chai Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Zaika Chai, Tea room, nr saraswat bank Pune/nashik high Way bhosari, Pune.

15/02/2023
15/01/2023

तीळगुळ घ्या विवेकाने बोला.

धूर्तपणे
गोड बोलण्यापेक्षा,
मोकळेपणाने,
सत्य बोला.🙏

कौशल्याने
सोयीच बोलण्यापेक्षा,
रीतीने,
न्यायाचं बोला.👍

कोणाला सुखावण्यासाठी
गोड बोलण्यापेक्षा,
सर्वांच्या फायद्यासाठी,
योग्य ते बोला.✊

हे सगळं पाळूनही द्वेष, शत्रू भावना अव्हेरू या,
समाजात माणुसकीची, प्रीत पेरू या...... ❤👍

मकर संक्रांतीच्या हार्दिक सदिच्छा...!!!
😊👍😊 👍😊

मुंबईच्या *5 स्टार हॉस्पिटल* मधे एक शिक्षक छातीत दुखतं असल्यामुळे तपासणीसाठी गेला डॉक्टरांच्या टीमने पेशन्टला तपासून लगे...
05/09/2022

मुंबईच्या *5 स्टार हॉस्पिटल* मधे एक शिक्षक छातीत दुखतं असल्यामुळे तपासणीसाठी गेला डॉक्टरांच्या टीमने पेशन्टला तपासून लगेच आजच्या आज बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला .... पेशन्ट खूप नर्व्हस झाला पण मनाची तयारी केली .
*..*

ऑपरेशनच्या अगोदरचे सगळ्या टेस्ट झाल्यानंतर डॉक्टरच्या टीमने बजेट सांगितलं... *१८ लाख रुपये* ... जे पेशन्टच्या कुटुंबातल्याना जरा जास्तच वाटू लागलं .
*..*
पण *"जान है तो जहान है"* हा विचार करुन फॉर्म भरायला लागले. फॉर्म भरताना व्यवसाय हा कॉलम आला तेव्हा ऑपरेशनच्या टेन्शनमुळे आणि पैशाची इकडून तिकडून जमावजमव करण्याच्या गडबडीत त्या कॉलमच्या पुढे त्याने
*E.D.* अस लिहलं .
*..*

आणि मग ... हॉस्पिटल मधलं सगळं वातावरणच बदललं ...

डॉक्टरांची दुसरी टीम चेकअप करायला आली.. री-चेकअप झालं. सर्व टेस्ट परत एकदा करण्यात आल्या. आणि मग डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेतला .... *"ऑपरेशन करण्याची गरज नाही, औषध गोळ्या घेऊन ब्लॉकेज जातील"!*

पेशन्टला डिस्चार्ज द्यायच्या आधी तीन महिन्याची औषधं फ्री दिली आणी चेकिंग फी मध्ये पण जबरदस्त डिस्काऊन्ट देऊन पाठवलं
---------------------------------------

या गोष्टीला सहा महिने झाले .... पेशन्ट आता चांगला ठणठणीत बरा झाला. आता पेशन्ट कधी कधी त्या हॉस्पिटलमधे चेकिंगला जायचा तर त्याच चेकिंग पण फ्री तर करायचेच आणि वर ज्यूस पाजल्याशिवाय डॉक्टर त्याला सोडायचे नाहीत.

पेशन्ट तर खूप खुष होता ! या हॉस्पिटलच्या वागणुकीमुळे सगळ्यांकडे या हॉस्पिटल आणि सर्व स्टाफच कौतुक करीत सुटायचा ! ...

पण बऱ्याच वेळा विचार करून हैराण व्हायचा की १५ वर्ष झाली नोकरी करुन त्याला ! पण *"Education Department"* चा एम्प्लॉई असल्या कारणाने इतका मान सन्मान त्याला घरात सुद्धा मिळाला नव्हता. इतकं त्या हॉस्पिटलवाल्यानी त्याला डोक्यावर चढवून ठेवलं होत....😂😂

*Happy Teachers Day!* 🙏🙏

 # First time try @ The kream story  @ The Kream Story
02/12/2019

# First time try @ The kream story @ The Kream Story

01/12/2019
06/06/2019
13/05/2019

युरोप कप फुटबॉलच्या एका उपांत्य सामन्यात प्रेक्षकांमधून कोणीतरी पावाचा तुकडा मैदानावर त्या खेळाडूच्या दिशेने भिरकावला। खरं तर त्याने त्याकडे दुर्लक्ष करायला हवं होतं किंवा तो तुकडा उचलून सीमारेषेवर भिरकावून द्यायला हवा होता। कारण वार्षिक तीन चारशे कोटी कमाई करणारा तो अब्जाधीश फुटबॉलपटू होता। तोपर्यंत तो दोन विश्व चषक खेळला होता अन एक विश्व चषक जिंकण्यात सहभागी झाला होता। त्याने उद्धटपणे काहीही केलं असतं तरी ते त्याला शोभून दिसलं असतं।

परंतु त्याने तसं काही केलं नाही। त्याने असं काही केलं ज्यामुळे जगातील करोडो फुटबॉल शौकिनांच्या हृदयालाच त्याने हात घातला। त्याची ती एक छोटीशी अनपेक्षित कृती पण करोडो लोकांना एक चांगला संदेश देऊन गेली। असं काय केलं त्याने ?

त्या अब्जाधीश खेळाडूने तो पावाचा तुकडा विनम्रतेने खाली वाकून उचलला। दोन्ही हाताने हळुवारपणे धरून त्याने त्या तुकड्याचं चुंबन घेतलं अन आपल्या कपाळाला लावून त्याने पावाच्या त्या तुकड्याचे कृतज्ञपणे जणू आभार मानले अन तो तुकडा त्याने विनम्रपणे बाजूला नेऊन ठेवला। "अन्न म्हणजे परब्रह्म" हा संदेशच जणू त्या खेळाडूने जगातील करोडो फुटबॉल शौकिनाना दिला। प्रत्येक धर्म हेच सांगत आलाय पण आपण कधी ते मनावर घेत नाही।

आपण हॉटेलमध्ये कुटुंबासह जातो अन नको इतके पदार्थ मागवतो। पोट भरलं कि उरलेलं टाकून देतो। याला पैशाची मस्ती म्हणतात। पैसे मोजले म्हणून काही त्या अन्नाशी कसंही वागायचा तुम्हाला हक्क मिळत नाही। अनेक देशात असं अन्न टाकलं तर दंड ठोठावतात।

हजार दोन हजार रुपये फेकण्यापूर्वी त्या अन्नासाठी कोणीतरी उन्हातान्हात किती राब राब राबलाय हे कधी विसरू नका आणि अन्नाची नासाडी करू नका असा जणू संदेशच देऊन माणुसकीचं दर्शन उभ्या जगाला घडविणाऱ्या त्या महान फुटबॉलपटूला विनम्र अभिवादन..!

त्या महान फुटबॉलपटूचे नाव आहे, मॅसुट ऑझील.

Address

Nr Saraswat Bank Pune/nashik High Way Bhosari
Pune
411039

Opening Hours

Monday 6am - 10pm
Tuesday 6am - 10pm
Wednesday 6am - 10pm
Thursday 6am - 10pm
Friday 6am - 10pm
Saturday 6am - 10pm
Sunday 6am - 10pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zaika Chai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zaika Chai:

Share

Category